नाना पटोले यांना हटवण्यासाठी शिष्टमंडळ दिल्लीत!
नवी दिल्ली : खरा पंचनामा
काँग्रेसमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले टार्गेटवर असल्याचे दिसत आहे. त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करत पक्षातील एका शिष्टमंडळाने दिल्ली तळ ठोकला आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे नाना पटोले यांना पदावरून हटवण्याची मागणी केल्याचे समजते.
महाराष्ट्र काँग्रेसचे जेष्ठ नेते विजय वड्डेटीवार सध्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करतायत. त्यांनी अशी पाऊले नेमकी का उचलली याची आता चर्चा सुरू आहे. अशात पटोलेंनी चंद्रपूरमधील काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवतळे यांची तातडीत हकालपट्टी केली होती. याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी असं पाऊल उचललं असल्याचं म्हटलं जात आहे.
नाना पटोले यांना हटवण्याची विनंती केली जात आहे. यासाठी राज्यातील माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम, राष्ट्रीय सचिव शिवाजीराव मोघे यांच्यासह अनेक नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. येथे त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आहे, अशी माहिती देखील सूत्रांकडून देण्यात आलीये.
राज्यातील कोणत्याही नेत्याशी पटोले यांचा समन्वय दिसत नाही. ते एकटेच पुढे जातात कोणालाही विचारात किंवा बरोबर घेत नाहीत. नाना पटोले महाराष्ट्रातील 'नवज्योत सिंह सिद्धू' झाले आहेत. काँग्रेस वाचवायची असेल तर पटोले यांना हटवावे लागेल, असं शिष्टमंडळाचं मत असल्याचं समजलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.