Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीतील व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्यास पुण्यात अटक

सांगलीतील व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्यास पुण्यात अटक



पुणे : खरा पंचनामा

सांगलीतील व्यापाऱ्यांसह अन्य शहरातील भुसार मालाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेल्या मालाचे पैसे न देता अर्थिक फसवणूक करणाऱ्याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. मागील वर्षभरापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.

हितेश नानकराम आसवानी (वय 35, रा. दत्तनगर, भांडेवाडी, बगडगंज, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा साथीदार भूषण वसंत तन्ना (रा.  वाठोडरिंग रोड, नागपूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसवानी आणि तन्ना यांनी पिंपरीतील काळेवाडी परिसरात राधा एंटरप्रायजेस नावाने व्यवसाय सुरू केला होता.

आरोपींनी पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून तूप, गूळ, बदाम, सुपारी, रवा असा माल मोठ्या प्रमाणावर खरेदी केला होता. सुरुवातीला व्यापाऱ्यांना विश्वास बसावा यासाठी आसवानी आणि तन्ना व्यापाऱ्यांचे द्यायचे. मात्र, त्यानंतर व्यापाऱ्यांची पैसे थकवून दोघेजण पसार झाले. त्या दोघांविरोधात विरुद्ध पुण्यातील स्वारगेट, सांगलीतील तासगाव, नागपूरमधील लकडगंज, नंदनवन, तहसील पोलीस ठाण्यात फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल आहेत.

आसवानी पिंपळे गुरव परिसरात येणार असल्याची माहिती स्वारगेट पोलीस ठाण्यातील तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून आसवानीला पकडले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.