Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'मी पुन्हा येईन' म्हटले की मी कसा येतो हे माहितीच आहे!

'मी पुन्हा येईन' म्हटले की मी कसा येतो हे माहितीच आहे!



कोल्हापूर : खरा पंचनामा

मी पुन्हा येईन, असे म्हटले की मी पुन्हा येतोच आणि कसा येतो हेही माहितीच आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. बेळगाव दौरा करुन कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये पोहोचल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

सीमाभागात दौ-यावर असलेल्या फडणवीसांनी चंदगड तालुक्यातील निट्टर गावातल्या नरसिंह मंदिराला अचानक भेट दिली. त्यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. मी पुन्हा येईन असे फडणवीसांनी म्हटले आणि शिवसेनेत मोठी फुट पडून ते उपमुख्यमंत्री झालेत. त्यामुळे आता कोणता राजकीय भूकंप होणार, याची चर्चा सुरु झाली असून अनेकांच्या भुवया उंचावल्यायत.

कोल्हापूरच्या चंदगडमध्ये भगवान श्री नृसिंह मंदिरात देवेंद्र फडणवीसांनी दर्शन घेतले. यावेळी फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी हे विधान केले. पाटीलसाहेब, तुम्हाला एवढंच सांगतो की, इथे एकदा येऊन मन भरत नाही. त्यामुळे मी पुन्हा येणार आहे. तुम्हाला माहित आहे की जेव्हा मी सांगतो मी पुन्हा येईन, तेव्हा मी नक्की येतो. कसा येतो हेही तुम्हाला माहिती आहे. आपले कुलदैवतच नरसिंह आहे. आपण कुठूनही प्रगती करतो, असे यावेळी ते म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.