Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरज सिव्हिलमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

मिरज सिव्हिलमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा



मिरज : खरा पंचनामा

मिरज सिव्हिलमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सिव्हिलमधील सर्व परीचारकांचा सन्मान करण्यात आला. रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी
12 मे हा दिवस 'जागतिक परिचारिका दिन' म्हणून जगभरात साजरा केला जातो. 

1971 मध्ये आंतराष्ट्रीय परिचारिका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. फ्लोरेन्स नायटिन्गेल यांनी आधुनिक नर्सिंगचा पाया रचला. त्यांच्याच स्मरणार्थ हा दिन साजरा केला जातो. 

1854 च्या युद्धकाळात फ्लोरेन्स नाईटिंगेल यांनी जखमी आणि आजारी सैनिकांच्या सेवेसाठी दिवसरात्र एक केले. सैनिकांच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला त्या पत्र पाठवत असत. रात्रीच्या वेळी हातात दिवा घेऊन त्या रुग्णांची विचारपूस करत असत, त्यांची देखभाल करायच्या. यामुळे सैनिक प्रेम आणि आदराने त्यांना 'लेडी विद लॅम्प' म्हणायचे. 1856 मध्ये युद्धानंतर परतल्यानंतर याच नावाने त्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे त्याच्या प्रित्यर्थ सर्वत्र हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

मिरज सिव्हिलमध्ये यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता डॉ. सुधीर ननंदकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशीर मिरगुंडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे अधीसेविका श्रीमती वंदना शहाने, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन सहा. अधिसेविका सौ. सुरेखा माने, सुनीता कावले, सार्वजनिक आरोग्य परिसेविका संजीवनी मोहिते, पद्मा कबाडे, नर्सिंग संघटनेच्या अध्यक्षा प्रतिभा हेटकाळे, उल्हास मोहिते, विशाल शेवटे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.