Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कडबा कुट्टी मशीनचा शॉक लागून पैलवानाचा मृत्यू

कडबा कुट्टी मशीनचा शॉक लागून पैलवानाचा मृत्यू



कोल्हापूर : खरा पंचनामा

गोठ्यातील कडबा कुट्टी मशीनचा शॉक लागून एका पैलवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कावणेमध्ये मंगळवारी घडली. 

शिवदत्त उर्फ सोन्या मारुती पाटील (वय 28 रा. कावणे, ता. करवीर) असे मृत पैलवानाचे नाव आहे. शेतात जनावरांच्या गोठ्यात कुट्टी मशीनने वैरण बारीक करत असताना शॉक लागल्याने सोन्याचा अकाली मृत्यू झाला. लेकाच्या अकाली मृत्यूने कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. पैलवान सोन्याच्या दुर्दैवी मृत्यूने गावावरही शोककळा पसरली आहे. 

निगवे खालसा गावातील तालमीमध्ये सोन्या सराव करणाऱ्या शिवदत्तने कुस्तीमध्ये ओळख निर्माण केली होती. त्याने पैलवानकी करतच आपले पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. शिवदत्तचे वडील 'गोकुळ'मध्ये प्रशिक्षण वर्गाचे अधिकारी आहेत. तसेच प्रवचनकार, कीर्तनकार म्हणून त्यांची ओळख आहे.

शिवदत्त पैलवानकी करत असतानाच घरची जनावरे सांभाळून दुग्ध व्यवसाय करत होता. मंगळवारी शेतातील जनावरांच्या गोठ्याकडे गेला असता कडबा कुट्टी मशीनच्या सहाय्याने वैरणीची कुट्टी करत असताना विजेचा धक्का बसला आणि तो तिथेच कोसळला. बराच वेळ होऊनही शिवदत्त घरी न आल्याने आईने त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फोन उचलत नसल्याने आई गोठ्याकडे गेली तेव्हा शिवदत्त कडबा कुट्टी मशीनच्या बाजूस पडलेला दिसला. यावेळी आईने केलेल्या आरडाओरडा ग्रामस्थही दाखल झाले. शिवदत्तला ग्रामस्थांनी उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.