Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पत्नीसह मला धमक्या येताहेत; विशेष सुरक्षा द्या : समीर वानखेडे

पत्नीसह मला धमक्या येताहेत; विशेष सुरक्षा द्या : समीर वानखेडे



मुंबई : खरा पंचनामा

मला आणि माझ्या पत्नीला गेल्या ६ दिवसांपासून सातत्याने धमकी देण्यात येत आहेत. आमच्या दोघांच्याही सोशल मीडिया अकाऊंटवर अश्लील मेसेज आणि धमक्या येत आहे. आमच्या दोघांच्याही जिवाला धोका आहे, असे पत्र 'एनसीबी'चे अधिकारी समीर वानखेडे यांनी मुबईच्या पोलिस आयुक्तांना लिहिले आहे. समीर वानखेडे यांनी विशेष सुरक्षा पुरविण्याची मागणीही केली आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे यांची सध्या सीबीआय चौकशी सुरू आहे. याप्रकरणात वानखेडे यांचा आर्थिक व्यवहारांमध्ये सहभाग आहे. शाहरूख खानसोबत बोलणे झाल्याचे समीर वानखेडे यांनी 'एनसीबी'पासून लपवले, असे आरोप त्यांच्यावर आहेत. सध्या याप्रकरणात समीर वानखेडे यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

कॉर्डिलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान याची सुटका करण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर आहे. वानखेडे यांची याप्रकरणात सीबीआय चौकशी करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.