Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सातारा पोलिसांवर औंढा नागनाथ येथे हल्ला!

सातारा पोलिसांवर औंढा नागनाथ येथे हल्ला!



औंढा नागनाथ : खरा पंचनामा

फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताला अटक करण्यासाठी आलेल्या कोरेगाव (जि. सातारा) येथील पोलिस पथकावर ब्राह्मणवाडा तांडा (ता. औंढा नागनाथ) येथे संशयितासह नातेवाइकांनी हल्ला केला. यावेळी पोलिस उपनिरीक्षकाला धक्काबुकी करण्यात आली. वाहनाच्या काचाही फोडल्या. याप्रकरणी २६ जणांविरुद्ध औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्राह्मणवाडा तांडा येथील विनोद राठोड हा मुकादम म्हणून काम करतो. त्याने सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर कारखान्याला ऊसतोड मजूर पुरविण्यासाठी आठ लाख रुपयांची रक्कम घेतली. मात्र, मजुरांचा पुरवठा केला नाही. या प्रकरणी कोरेगाव (जि. सातारा) पोलिस ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली.

दरम्यान, विनोद त्याच्या गावी असल्याची माहिती मिळाल्यावरून कोरेगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अशोक राऊत, एस. एस. लावंड, एस. एस. सोनुळे, औंढ्याचे पोलिस कर्मचारी त्याला अटक करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी ब्राह्मणवाड्यात आले. पोलिसांनी घरी जाऊन विनोद याला आवाज दिला. तो बाहेर आल्यानंतर त्याला कोरेगाव पोलिस असल्याचे सांगितले. त्यानंतर विनोदने आरडाओरड सुरू केली.

त्यानंतर त्याचे नातवाईक आणि काही ग्रामस्थ जमा झाले. त्यानी थेट पोलिस पथकावरच हल्ला चढविला. यामध्ये उपनिरीक्षक राऊत यांच्यासह कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून खासगी वाहनाच्या काचा फोडल्या. त्यामुळे पथक परतले. दरम्यान, उपनिरीक्षक राऊत यांनी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात आज तक्रार दिली. यावरून पोलिसांनी विनोद नागोराव राठोड, नागोराव राठोड, संतोष सुरेश राठोड यांच्यासह अन्य २३ संशयितांविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.