नवाब मलिक यांच्या जामिनावर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार!
मुंबई : खरा पंचनामा
टेरर फंडिंगचा आरोप असलेले माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी नकार दिला होता. न्यायालयीन कामकाजाचा भार अधिक असल्यामुळे नकार दिल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे मालिक यांनी जामीन अर्जावर उच्च न्यायालयात होत असलेल्या विलंबामुळे जामीन मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्यावर सुनावणी घेण्यास नकार देत, तुम्ही मुंबई उच्च न्यायालयाकडेच जावे आणि त्यांनी जर तुम्हाला नकार दिला, तरच तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये येऊ शकता, असे म्हटले आहे.
नवाब मलिक यांच्यावर ईडीने त्यांनी दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या व्यक्तीकडून मालमत्ता खरेदी करत त्यात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवला आहे. ईडीने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे, मात्र ते आजारी असल्यामुळे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्यासमोर बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी व्यस्ततेचे कारण देत तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाकडेच जाण्यास सांगितले आहे.
प्रभू देसाई यांनी सूचीबद्ध झालेली याचिका सुनावणीसाठी घेता येणार नाही, असे वकील अमित देसाई यांना सांगितले. त्याचे कारण देताना, आता जी सुनावणी आली आहे त्याच्या खूप आधीपासून ज्यांचे जामीन अर्ज पडलेले आहेत, त्यांच्यावरच्या सुनावण्या सुरू आहेत. त्यामुळे आज नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.