Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कर्नाटकात अडीच-अडीच वर्षांचे दोन मुख्यमंत्री होणार!

कर्नाटकात अडीच-अडीच वर्षांचे दोन  मुख्यमंत्री होणार!



बंगळुरू : खरा पंचनामा

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसमधील दोन बडे नेते आहेत. राज्यभर त्यांचा चांगलाच दबदबा आहे. किंबहुना या दोन्ही त्यांनी कसून मेहनत केल्यामुळेच काँग्रेसला कर्नाटकात विजय मिळू शकला आहे. असे असतानाच येथे काँग्रेस मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार? असा प्रश्न विचारला जात आहे. यावरच मल्लिकार्जुन खरगे यांनी भाष्य केले आहे. काँग्रेस शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोन नेत्यांना अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री होण्याची संधी देण्याची शक्यता आहे. तसे संकेत खरगे यांनी दिले आहेत.

"लोकांनी मोदी तसेच भाजपाची सत्ता उलथवून लावण्याचे ठरवले आहे. कर्नाटकात आम्ही सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारची स्थापना करू. आता आमच्यावर फार मोठी जबाबदारी आलेली आहे. सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यावरही ही जबाबदारी आहे,” असे खरगे म्हणाले.

कर्नाटकमधील विजय हा सर्वांचाच विजय आहे, असेही खरगे म्हणाले. “कोणीही एक नेता कर्नाटकमधील विजय माझ्यामुळेच झाला आहे, असे म्हणू शकत नाही. या निवडणुकीत अमुक व्यक्ती नसती, तर त्याची जागा अन्य एखाद्या नेत्याने किंवा कार्यकर्त्याने घेतली असती. ही प्रक्रिया राजकीय पक्ष तसेच लोकशाहीमध्ये घडतच असते. जेव्हा नेते चांगली कामगिरी करतात. तेव्हा कर्नाटकमधील निवडणुकीप्रमाणे चांगला निकाल लागतो. मी डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोन्ही नेत्यांचे अभिनंदन करतो,” असे खरगे म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.