अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम?
मुंबई : खरा पंचनामा
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकामधील निकालाची महाराष्ट्रातही पुनरावृत्ती होईल, असं अजित पवार यांनी ट्विटमध्ये केलं आहे. तर त्यामध्ये म्हटलं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मित्रपक्षांची महाविकास आघाडी महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती करेल. लवकरच महाराष्ट्रात देखील अशीच लढाई पाहायला मिळेल. कारण महाराष्ट्रातील जनतेनं तसा निर्धार आधीच केला आहे. कर्नाटकातील मतदार, काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन! असं ट्विट केलं आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी पुढे असं म्हटलं आहे की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला दिलेला कौल हा कर्नाटक आणि देशाच्या राजकारणाची वाटचाल पुन्हा एकदा विकास आणि लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेनं सुरु झाल्याची नांदी आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानं भाजपची दक्षिणेकडील पुरती नाकाबंदी केली आहे. अस ट्विट करता टोलाही अजित पवार यांनी भाजपला लगावला.
तर त्यांच्या या ट्विटमुळे अजित पवार भाजपमध्ये जाणार या चर्चना पूर्णविराम मिळाला असल्याचं बोललं जातं आहे. तर आगामी निवडणूकिसाठी महाविकास आघाडीची पुढची काय रणनीती असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.