Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कर्नाटकात काँग्रेस सत्तेत येणार : सोलापुरात शरद पवारांचे भाकीत

कर्नाटकात काँग्रेस सत्तेत येणार : सोलापुरात शरद पवारांचे भाकीत



सोलापूर : खरा पंचनामा

कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत येणार आहे. फक्त ५ ते ७ राज्यात भाजपचे सरकार आहे. देशभरात भाजपची घसरण होत आहे. केरळ, तामिळनाडूमध्ये आता भाजप नाही. तेलंगणा, आंध्रप्रदेशमध्ये देखील भाजप नाही. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेमुळे सरकार आले. मध्यप्रदेशात कमलनाथ मुख्यमंत्री होते. तिथे देखील भाजपला आता संधी नाही, असे भाकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी आज सोलापुरात केले.

विठ्ठल साखर कारखाण्यात त्यांनी हजेरी लावली. या कारखाण्यात बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कर्नाटक निवडणुकीवर भाष्य केले.

तसेच शरद पवार यांनी बारसू रिफायनी प्रकल्पावर देखील भाष्य केले. पर्यावरणाला हानी पोहचत असेत तर असे प्रकल्प नको. लोकांवर कोणतीही सक्ती नको त्यांना विश्वासात घ्यायला हवे, असे शरद पवार म्हणाले.

संजय राऊत राष्ट्रवादीत येणार असे नितेश राणे म्हणाले होते. यावर शरद पवार म्हणाले, कोणीतरी सिरीयस बोलत असेल तर मी उत्तर देतो. हे राणे-बिने यांच्यावर मी काय बोलाव, असे पवार म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.