Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर : प्लॅन 'बी'नुसार सुळे यांच्या अध्यक्षपदी निवडीचा प्रस्ताव!

शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर : प्लॅन 'बी'नुसार सुळे यांची अध्यक्षपदी निवडीचा प्रस्ताव!



मुंबई : खरा पंचनामा

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या समितीच्या बैठकीत शरद पवार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करण्यात आला. प्लॅन ए आणि प्लॅन बी असे दोन महत्त्वाचे प्रस्ताव समितीकडून मांडले जाणार आहेत. पहिल्या प्रस्तावात शरद पवार यांनी आपल्या पदावर कायम राहावं असा निर्णय समस्य समिती देणार आहे. पहिल्या प्रस्तावाला शरद पवार तयार नसतील तर मात्र समिती दुसरा प्रस्ताव मांडणार आहे. दुसऱ्या प्रस्तावात एकमतानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांना समर्थन द्यावं, असं सुचवण्यात येणार आहे.

समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. सध्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळ पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. होतं. अशातच एका कार्यकर्त्यानं प्रदेश कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांकडून कार्यकर्त्यांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही कार्यकर्त्यांना वारंवार शांत राहण्याचं आवाहन करत आहेत. दरम्यान, शरद पवारांचं मुंबईतील निवासस्थान 'सिल्वर ओक'वर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.