Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील ३८५ अंमलदारांना पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती सांगलीतील ६, कोल्हापुरातील ९, साताऱ्यातील ७ जणांचा समावेश

राज्यातील ३८५ अंमलदारांना पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती
सांगलीतील ६, कोल्हापुरातील ९, साताऱ्यातील ७ जणांचा समावेश



मुंबई : खरा पंचनामा

राज्यातील तब्बल ३८५ अंमलदारांना पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. राज्याचे अपर पोलिस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांच्या स्वाक्षरीने याचे आदेश मंगळवारी काढण्यात आले आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील सहा, कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ तर सातारा जिल्ह्यातील सातजणांचा समावेश आहे. या अंमलदारांकडून पसंतीच्या महसूल विभागाची माहिती मागवण्यात आली होती. त्यानुसार त्यांना महसूली विभागाचे वाटप करण्यात आले आहे.  

उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळालेल्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील सुभाष मोरे, संजय परशकर, संजय पवार, युवराज पाटील, जयकुमार उथळे, बाजीराव वाघमोडे यांचा समावेश आहे. यातील मोरे, उथळे, पाटील, वाघमोडे यांची मसुपकडे पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे. तर परशकर यांची नवी मुंबई येथे पवार यांची रायगड येथे बदली करण्यात आली आहे. 

पदोन्नती मिळालेल्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ९ जणांचा समावेश आहे. स्वप्नाली कावडे यांची मुंबई लोहमार्ग, उत्तम वड्राळे यांची सीआयडीकडे, आप्पासाहेब पालखे, रविंद्र गायकवाड यांची मसुपकडे तर सुखदेव शेवाळे यांची दहशतवादविरोधी पथकाकडे बदली करण्यात आली आहे. प्रदीप जाधव यांची मसुपकडे, विजय घाटगे, किरण कागलकर, राजेंद्र सोनसुरकर यांची कोल्हापूर परिक्षेत्राकडे रविंद्र गायकवाड यांची मसुपकडे बदली करण्यात आली आहे. 

यामध्ये सातारा जिल्ह्यातील सातजणांना पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये हेमंतकुमार मुळीक यांची कोल्हापूर परिक्षेत्राकडे, विजय जाधव यांची मसुपकडे, सुनील सावंत, प्रताप भुजबळ, खलीप इनामदार, प्रमोद घाटगे, दत्तात्रय कदम यांची कोल्हापूर परिक्षेत्राकडे बदली करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.