Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अनैतिक संबंध मान्य नसल्यानेच चुलतीचा केला खून : पुतण्याच्या साथीदाराचे नाव निष्पन्न 'खरा पंचनामा'चे वृत्त ठरले खरे : पुतण्याला पोलिस कोठडी

अनैतिक संबंध मान्य नसल्यानेच चुलतीचा केला खून : पुतण्याच्या साथीदाराचे नाव निष्पन्न
'खरा पंचनामा'चे वृत्त ठरले खरे : पुतण्याला पोलिस कोठडी



सांगली : खरा पंचनामा

चुलतीचे अनैतिक संबंध मान्य नसल्यानेच तिचा खून केल्याची कबुली संशयित पुतण्याने दिली आहे. त्याला कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान या गुन्ह्यात संशयिताला मदत करणाऱ्या साथीदाराचे नाव निष्पन्न झाले असून त्याला लवकरच अटक करू असे कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी सांगितले. दरम्यान 'खरा पंचनामा'ने दिलेले वृत्त खरे ठरले.

निहाल सतपाल गोसावी (वय 20) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर गौरी जिनपाल गोसावी (वय 35) असे मृत महिलेचे नाव आहे. सोमवारी सकाळी लवकर निहालने बहाणा बनवून गौरीला कारमध्ये बसवले. तेथून तो तिला म्हैसाळ योजनेच्या सलगरे येथील 5 व्या टप्प्याजवळ घेऊन गेला. तेथे त्याने गौरीवर धारदार हत्याराने 5 ते 6 वार करत तिचा खून केला.

त्यानंतर त्याने तेथेच खड्डा खोदून तिचा मृतदेह पुरला होता. त्यानंतर मंगळवारी दुपारी तो स्वतःहुन संजयनगर पोलिस ठाण्यात हजर झाला आणि त्याने चुलतीच्या खुनाची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत मृतदेह बाहेर काढून पुढील सोपस्कार पार पाडले.

याप्रकरणी बुधवारी निहाल याला कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने साथीदाराच्या मदतीने हा खून केल्याची कबुली दिली. त्याच्या साथीदाराचे नाव निष्पन्न झाले असून त्याला लवकरच अटक करू असे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी सांगितले.

'खरा पंचनामा'चे वृत्त खरे ठरले
मंगळवारी 'खरा पंचनामा'ने अनैतिक संबंध मान्य नसल्याने पुतण्याने चुलतीचा खून केल्याचे वृत्त दिले होते. बुधवारी संशयिताला अटक करून पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तेच कारण पुढे आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.