Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आम्हीच मुस्लिमांचे आरक्षण संपुष्टात आणले : अमित शाह

आम्हीच मुस्लिमांचे आरक्षण संपुष्टात आणले : अमित शाह



गुब्बी : खरा पंचनामा

भाजप सरकारने मुस्लिमांचे चार टक्के आरक्षण संपुष्टात आणले आणि वोक्कलिंग, लिंगायत व एससी, एसटींचा कोटा वाढवला, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. कर्नाटकातील गुब्बी येथे भाजपने सोमवारी  रोड शो केला. या शोनंतर अमित शाह यांनी लोकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

ते म्हणाले, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकसाठी खूप मोठे काम केले आहे. भाजपने मुस्लिमांचे चार टक्के आरक्षण संपुष्टात आणले; तर वोक्कलिंग, लिंगायत, एससी, एसटींचा आरक्षणाचा कोटा वाढवला. जर काँग्रेस सत्तेत आली तर हा कोटा कमी करतील आणि मुस्लिमांचे चार टक्के आरक्षण पुन्हा लागू करतील. 

तुम्हाला मुस्लिमांचे आरक्षण पुन्हा लागू केलेले चालणार आहे का? असा प्रश्नही शाह त्यांनी विचारला. कर्नाटकमध्ये डबल इंजिनचे सरकार निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले. जर कर्नाटकमध्ये भाजप निवडून आला, तर मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील, असेही शाह यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.