Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

साताऱ्यात व्हेल माशाची उलटी जप्त : हुपरीतील एकासह चौघांना अटक

साताऱ्यात व्हेल माशाची उलटी जप्त : हुपरीतील एकासह चौघांना अटक



सातारा : खरा पंचनामा

पुणे-बंगळुरू महामार्गावर वाढे येथे शोरूमजवळ स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून रुग्णवाहिकेतून व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) घेऊन जाणाऱ्या चौघांना अटक केली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अंबरग्रीस या उलटीची किंमत पाच कोटी त्रेचाळीस लाख दहा हजार रुपये इतकी आहे या प्रकरणातील चौघांकडे कसून चौकशी सुरू आहे.

या प्रकरणी सिद्धार्थ लकडे (वय ३१, रा. कासारविली), अनिस इसा शेख (वय ३८, रा. हुपरी, हातकणंगले), नासिर अहमद रहमान राऊत (वय ४० रा. भडकंबा, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी), किरण गोविंद भाटकर (वय ५०, रा. भाटीये, रत्नागिरी) या चौघांना अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना काही गोपनीय मुद्देमाल साताऱ्यातून नेला जाणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महामार्ग परिसरात सापळा रचला. 

महामार्ग परिसरातील शोरूमच्या समोर पुणे बाजूने सर्विस रोडवर एका रुग्णवाहिकेला पोलिसांनी अडवून संबंधित चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. रुग्णवाहिकेची तपासणी केली असता एका काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये तपकिरी रंगाचा ओबडधोबड पदार्थ आढळून आला. वनविभागाच्या सहकार्याने या पदार्थाची तपासणी केली असता तो पदार्थ व्हेल माशाची उलटी असल्याचे स्पष्ट झाले. या पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये किंमत ५ कोटी ४३ लाख १० हजार रुपये किंमत असल्याचे सांगण्यात आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.