दोन हजारांच्या बनावट नोटा जमा करणाऱ्या महिलेस अटक!
सांगली : खरा पंचनामा
बत्तीस शिराळा येथे २ हजार रुपयांच्या बनावट नोटा जमा करणाऱ्या महिलेस अटक करण्यात आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला. याप्रकरणी शुक्रवारी महिलेस अटक करण्यात आली.
सविता सुरेश लोकरे (रा. पाडळेवाडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी आयसीआयसीआय बँकेचे कर्मचारी मच्छिंद्रनाथ पवार यांनी शिराळा पोलिसांत फिर्याद दिली आहे. गुरुवारी दुपारी अडीच वाजता सविता लोकरे यांनी आयसीआयसीआय बँकेमध्ये 50 हजार रुपयांचा भरणा केला. त्यामध्ये दोन हजार रुपयांच्या 13 नोटा होत्या. या 13 नोटा बँकेने तपासल्या असता त्या बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर याबाबतची फिर्याद शिराळा पोलिसांत देण्यात आली.
याप्रकरणी सविता लोकरे या महिलेस अटक करण्यात आली आहे. अधिक तपास तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर करीत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.