Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी हवालदाराने ईडीची नोटीस दिली!

लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी हवालदाराने ईडीची नोटीस दिली!





मुंबई : खरा पंचनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. या नोटीसीत त्यांना सोमवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नोटिशीबाबत जयंत पाटील म्हणाले की, आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. आणि आजच माझ्या घरी हवालदार आला आणि मला ईडीची नोटिस देऊन गेला.

आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी आर्थिक मोठा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप होता. ईडीकडून या प्रकरणी जयंत पाटील यांना सोमवारी हजर राहण्याचे समन्स देण्यात आले आहे. ईडीची नोटीस अद्याप मिळाली नसल्याचे पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे. आयएलएफस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. त्यांनी आयएलएफस च्या माध्यमातून अनेक बड्या लोकांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे यापूर्वी या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर आता जयंत पाटील यांना ईडीने चौकशीसाठी पाचारण केले आहे.

या प्रकरणात सर्वप्रथम दिल्लीतील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती पाहता हे प्रकरण ईडीकडे सोपवण्यात आले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.