दोन हजारांच्या नोटा देऊन सोने खरेदी करणाऱ्यांना दणका!
सांगली : खरा पंचनामा
आरबीआयने नुकत्याच दोन हजारांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा बदलण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तरीही नागरिक नोटा बदलण्यासाठी धावपळ करत आहेत. अनेकांनी दोन हजारांच्या नोटा देऊन सोने खरेदीचा पर्याय निवडला आहे. मात्र त्यांना त्याचा चांगलाच दणका बसत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या विवाहाचे मुहूर्त असल्याने तसेच दोन हजारांच्या नोटा खपवण्यासाठी सराफ बाजारात गर्दी होत आहे. मात्र दोन हजारांच्या नोटा देऊन सोने, चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी अधिक किंमत मोजावी लागत आहे असे ग्राहकांकडून सांगण्यात येत आहे.
सध्या सोन्याचा दर प्रति तोळा 62 हजार रुपये इतका आहे. मात्र ग्राहक दोन हजारांच्या नोटा देत असेल तर तोच दर 66 हजार रुपये प्रति तोळा ते 75 हजार रुपये सराफांकडून घेतले जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. मात्र नोटा बदलायच्या असल्याने अनेक ग्राहक कोणतीही कुरबुर न करता या नोटांच्या बदल्यात सोने, चांदीचे दागिने खरेदी करत आहेत. मात्र याबाबत सराफांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.