Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दुर्मिळ खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक : सांगली एलसीबीची कारवाई

दुर्मिळ खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक : सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

मिरज तालुक्यातील कुपवाड येथील अहिल्यानगर येथे दुर्मिळ खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.

इम्रान अहमद मुलाजी (वय ४२, रा. अलोरे ता. चिपळुण जि. रत्नागिरी), दिनेश गोपाळ डिंगणकर (वय ४५, रा. चिंद्रवळे ता. गुहागर जि. रत्नागिरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी वन्य प्राण्यांची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पोलिस निरीक्षक  शिंदे यांनी सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांचे विशेष पथक तयार केले होते.

पथकाला कोकणातील दोघेजण दुर्मिळ खवले मांजर विक्रीसाठी कुपवाड येथील अहिल्यानगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने मंगळवारी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील सॅकची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये दुर्मिळ खवले मांजर आढळले. त्याबाबत चौकशी केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांना कुपवाड एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एलसीबीचे पोलिस निरीक्षक पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे, संदिप पाटील, संजय कांबळे, संकेत मगदुम, सुनिल चौधरी, गौतम कांबळे, अजय बेंदरे, संकेत कानडे, ऋषीकेश सदामते, कॅप्टन गुंडवाडे तसेच वन विभागा कडील मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार आण्णा पाटील, वनपाल तुषार महालिंग भोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

विशेष संरक्षक प्रजातीत समावेश
सदरचे खवले हे अतिशय दुर्मीळ, संरक्षित व नामशेष होत असलेल्या खवल्या मांजराचे असुन सदरच्या खवल्यांचा उपयोग महागडी औषधे, आंतरराष्ट्रीय दर्जाची सौंदर्य प्रसाधने आदी बनविण्यासाठी केला जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे सदर खवल्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात मोठया प्रमाणात मागणी असुन याची उच्च दराने विक्री करण्यासाठी तस्करी फेली जाते. हा वन्यजीव नामशेष होण्याचे मार्गावर असल्याने खवले मांजर या प्रजातीच्या संरक्षणासाठी सदर वन्यजिवास शासनाने विशेष संरक्षित प्रजातीमध्ये समाविष्ट केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.