Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कितीही दिवस लागो, तो तपास शेवटी करावा लागेल!

कितीही दिवस लागो, तो तपास शेवटी करावा लागेल!



मुंबई : खरा पंचनामा

राहुल नार्वेकर हे भाजप आमदार असून, ते पक्षांतर करून भाजपत आले आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकरांना पक्षांतराचे वावडे नसेल. राहुल नार्वेकरांकडून न्याय्य निकाल येणार नाही, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या चौकटीत योग्य त्या प्रक्रियांचा अवलंब करूनच आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला जाईल, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, यातच आता उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी यावर भाष्य करताना सूचक विधान केले आहे.

माध्यमांशी बोलताना झिरवळ म्हणाले, तपासण्यापलीकडे त्यांच्याकडे मार्ग नाही. पण कितीही दिवस तपासत राहिले, तरी तपास शेवटी ठरलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने १० ते १२ त्रुटी सांगितल्या आहेत. त्या सगळ्याच विरोधात आहेत. फक्त एकच बाब आहे की, ते तपासायला राहुल नार्वेकरांकडे दिले आहे. तपास हा तपासच असतो. तो कधीपर्यंत चालेल याची खात्री नाही, असे नरहरी झिरवळ यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना विधानसभा अध्यक्षांना फक्त योग्य वेळेत किंवा लवकरात लवकर निर्णय घ्यावा, एवढेच सांगितले आहे. त्यामुळे हा निकाल नेमका कधी येणार? याविषयी कोणतीही स्पष्टता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात नाही. यावर बोलताना झिरवळ म्हणाले की, लवकरात लवकर ही एक राजकीय व्यासपीठावरची किंवा सभागृहातील भाषा आहे. लवकरात लवकर याला कधीही लवकर म्हणता येते. परवाही लवकर आणि सहा महिन्यांनीही लवकरच असते, अशी खोचक प्रतिक्रिया झिरवळ यांनी दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.