Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजित पवार राष्ट्रवादीतच, पण...

अजित पवार राष्ट्रवादीतच, पण...





बेळगाव : खरा पंचनामा

अजित पवारांची चर्चा बाहेर आहे. त्यावर मी सामनातून भाष्य केलं आहे. मी कुठेही जाणार नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीतच राहीन, असं अजित पवार वारंवार सांगत आहेत. त्यांच्याविषयीच्या अफवांना पूर्णविराम दिला पाहिजे. अजित पवार आणि त्यांचं कुटुंब एक नातं आहे. पण राजकारण वेगळं असतं. राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. राऊत सध्या कर्नाटकात प्रचारात आहेत. आज त्यांनी एका वृत्तवाहिनिशी बोलताना हे वक्तव्य केले आहे.

राऊत म्हणाले, अजित पवार महाष्ट्रात स्थिर आहेत. सुप्रिया सुळे यांना मी राष्ट्रीय स्तरावर काम करताना पाहतो. त्या उत्तम काम करत आहेत. संसदेतील त्यांचा परफॉर्मन्स उत्तम आहे. पण संसदेतील परफॉर्मन्स आणि राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारल्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या त्या पेलणं, ती ताकद असणं यात खूप फरक असतो. शरद पवारांना 60 ते 65 वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे ते राष्ट्रीय स्तरावर गेले, असं राऊत यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीतील घडामोडींवर 'सामना'त फार जपून भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीतील घडामोडीमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण व्हावा हा त्यांचा अंतर्गत निर्णय आहे. अध्यक्ष कोण व्हावा याचा निर्णय घ्यायला त्यांचे नेते सक्षम आहेत, असेही राऊत म्हणाले.

शरद पवार असतील किंवा बाळासाहेब ठाकरे असतील किंवा इंदिरा गांधी हे टोलेजंग नेते आहेत. जेव्हा त्यांच्या घरातून कोणी वारसदार येतात तेव्हा त्यांना ती उंची गाठता येत नाही. कारण हे नेते महान व्यक्तीमत्त्व आहेत. पण आम्ही त्यांची तुलना त्यांच्या वडिलांशी करतो. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांची तुलना होऊच शकत नाही, असंही राऊत म्हणाले.

ते म्हणाले, शरद पवारांना मी व्यक्तीश: नेहमी भेटत असतो. त्यांना भेटण्यात काही अडचण नसते. त्यांनी घेतलेले निर्णय हे त्यांच्या राजकारणातील भूमिकांविषयी असू शकतात. पक्षातील धोरणांविषयी असू शकतात. अशावेळी बाहेरच्या व्यक्तीने बोलणं योग्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.