महाराष्ट्रातील युतीच्या लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला!
मुंबई : खरा पंचनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या सर्व खासदारांची एक बैठक नुकतीच झाली. या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीमध्ये 2019 मध्ये शिवसेनेनं ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्या 22 मतदारसंघात पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शिवसेना शिंदे गटाकडे सध्या 13 खासदार आहेत, तर ठाकरे गटाकडे 5 खासदार आहेत. ठाकरे गटाकडे असलेल्या खासदारांच्या मतदारसंघात उमेदवार कोण असणार याचा निर्णय एकनाथ शिंदे लवकरच घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत 2019 च्या जागा वाटपाप्रमाणेच म्हणजेच शिवसेना 22 आणि भाजप 26 हा फॉर्म्युला कायम राहणार असल्याचे समजते. त्यानुसार आता शिंदे गट आणि भाजपने रणनिती ठरवण्यास सुरूवात केल्याचं देखील वृत्त आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.