Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

न्यायाधीशांशी गैरवर्तन : पोलिस निरीक्षक निलंबित!

न्यायाधीशांशी गैरवर्तन : पोलिस निरीक्षक निलंबित!



गडचिरोली : खरा पंचनामा

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकिवेळी गण्यारपवार यांना मारहाण केल्याप्रकरणी चर्चेत आणि वादाच्या भोवऱ्यात आलेले चामोर्शी ठाण्याचे निरीक्षक राजेश खांडवे यांना न्यायाधीशांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. 

ज्या पोलिस ठाण्यात त्यांनी इनचार्ज अधिकारी म्हणून काम केले, त्याच ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. चामोर्शी बाजार समिती निवडणुकी दरम्यान अतुल गण्यारपवार यांना पोलिस ठाण्यात पहाटे बोलावून मारहाण केल्याचा आरोप गण्यारपवार यांनी पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर केला होता.

त्यानंतर पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्याविरुद्ध चामोर्शीत आंदोलन झाले होते. त्यानंतर गण्यारपवारांनी चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात धाव घेतली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. मेश्राम यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत 20 मे रोजी खांडवेंवर IPC कलम 294, 324, 326, 342 अन्वये गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले.

आज गुरुवारी सकाळी खांडवे न्यायाधीश मेश्राम यांच्या घरी गेले. गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यावरुन खांडवे यांनी न्यायाधीश मेश्राम वाद घालून गैरवर्तन केले. न्यायाधीश मेश्राम यांनी ही बाब पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना सांगितली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.