Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सीबीआयच्या फिर्यादीत समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप!

सीबीआयच्या फिर्यादीत समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप! 



मुंबई : खरा पंचनामा 

सीबीआयकडून एनसीबीचे मुंबईतील तत्कालीन संचालक समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करताना कॉर्डलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणाचा वृत्तांत सादर करण्यात आला आहे. सीबीआयने दिलेल्या फिर्यादीत अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 

वानखेडे आणि इतर जणांनी हा कट कसा रचला याबद्दलची माहिती त्यात नमूद करण्यात आली आहे. शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान एनसीबीच्या आणि खास करून वानखेडे आणि पंच असलेल्या किरण गोसावीच्या ताब्यात आहे, हे दाखवण्यासाठीच आर्यनचा ताबा के. पी. गोसावीला देण्यात आला होता. वानखेडे यांच्या आदेशानुसारच गोसावी आर्यनला घेऊन एनसीबी कार्यालयात आला होता, असं सीबीआयच्या फिर्यादीत म्हटले आहे. 

एनसीबीच्या कार्यपद्धतीच्या बाहेर असूनही एका पंचाला अशा कारवाईवेळी मुक्तपणे वावरण्याचे आणि एनसीबी कार्यालयात येण्याचे अधिकार वानखेडे यांनी दिले. समीर वानखेडे आणि आशिष रंजन यांनी त्यांच्या घोषित केलेल्या मालमत्तेपेक्षा अधिक संपत्ती मिळवली. समीर वानखेडे यांनी केलेल्या परदेश वारीचे म्हणावे तसे स्पष्टीकरण व्हिजिलन्स टीमच्या चौकशीत त्यांनी दिले नाही. महागडी घड्याळ आणि महागड्या गाड्या कुठून आल्या याचेही उत्तर देण्यात वानखेडे असमर्थ राहिले अस सीबीआयने फिर्यादीत म्हटलं आहे.


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.