Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आता प्रदीप कुरुलकरबाबत एटीएसने घेतला हा निर्णय!

आता प्रदीप कुरुलकरबाबत एटीएसने घेतला हा निर्णय!



मुंबई : खरा पंचनामा

डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर चौकशीत सहकार्य करत नाही. त्यामुळे त्याची पॉलीग्राफी टेस्ट करण्याचा निर्णय एटीएसने घेतला आहे. एटीएसला टेस्ट करण्यासाठी न्यायालयाची परवानगी मिळाली असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

पॉलिग्राफी टेस्टमध्ये माहिती मिळाली नाही तर नार्को टेस्ट ही केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. काल पुणे न्यायालयाने कुरुलकरला एक दिवसांची कोठडी सुनावली आहे.
प्रदीप कुरुलकर आणि निखिल शेंडे दोन वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांनी एकाच आयपी एड्रेसवरुन मेसेजे आले होते. या दोघांमध्ये काही संभाषण देखील झाल्याची माहिती समोर आली आहे. या अनुषंगाने आता तपास देखील सुरु आहे. तपासासाठी हवाई दलाची एक टीमही तयार करण्यात आली आहे, अशी माहिती आता समोर आली आहे.

प्रदीप कुरुलकर याचा मोबाईल एटीएसने ताब्यात घेतला. तो फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला होता. पण तो डीकोड झाला नव्हता. तो एटीएसकडे पाठवण्यात आला. मग पुन्हा कुरुलकर यांच्यासमोर डीकोड करण्यात आला. मोबाईलमध्ये जे स्क्रिनशॉट काढण्यात आले होते त्यामध्ये एक लिहिलं होतं की, प्रदीप तू मला ब्लॉक का केलं आहेस? हा मेसेज निखिल शेंडे याच्या मोबाइलवरुन गेला होता. पोलिसांच्या तपासानंतर ते स्पष्ट झाले.

पॉलीग्राफी चाचणीमध्ये, रक्तदाब, नाडी आणि श्वासोच्छवासाची गती यासारख्या शारीरिक क्रियाकलापांची नोंद केली जाते आणि या डेटाचा वापर व्यक्ती सत्य बोलत आहे की नाही हे शोधण्यासाठी केला जातो. दुसरीकडे, नार्को टेस्टमध्ये व्यक्तीची आत्मभान कमी होते ज्यामुळे तो मोकळेपणाने बोलू शकतो.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.