Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जेजे'मध्ये लवकरच अद्ययावत हृदय शस्त्रक्रिया कक्ष : अधिष्ठाता डॉ. सापळे

'जेजे'मध्ये लवकरच अद्ययावत हृदय शस्त्रक्रिया कक्ष : अधिष्ठाता डॉ. सापळे



मुंबई : खरा पंचनामा

हृदय शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांना उत्तम सुविधा मिळाव्या यासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात अद्ययावत हृदय शस्त्रक्रिया कक्ष उभारण्यात येत आहे. ५६ खाटांच्या या अद्ययावत सुविधा कक्षामध्ये स्वतंत्र अतिदक्षता विभाग आणि डॉक्टरांसाठी खोलीही असणार आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी खरा पंचनामाशी बोलताना दिली.

डॉ. सापळे म्हणाल्या, यामुळे रुग्णांना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे शक्य होणार आहे. या कक्षाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच हा कक्ष रुग्णांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे. जे. रुग्णालयामध्ये हृदयासंदर्भात शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात. या रुग्णांसाठी सध्या जे. जे. रुग्णालयामध्ये ४२ खाटांचा साधारण कक्ष आहे. मात्र रुग्णांना अधिकाधिक आणि अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी जे. जे. रुग्णालयामध्ये २१ क्रमांकाचा कक्ष अद्ययावत करण्यात येत आहे. 

या कक्षामध्ये स्वतंत्र अतिदक्षता विभाग, प्राणवायू, जीवन रक्षक प्रणालीची सुविधा, सुसज्ज खाटा, तसेच रुग्णांची सोय लक्षात घेऊन विविध सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे कक्षामधील रुग्णांना तातडीने वैद्यकीय सुविधा पुरवता यावी यासाठी डॉक्टरांकरीता स्वतंत्र कक्ष उभारण्यात येत आहे. या कक्षाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच तो रुग्णांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे, अशी माहिती डॉ. सापळे यांनी दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.