Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एक्साईजच्या दुय्यम निरीक्षक, लिपिक, कार्यालयीन अधीक्षकांच्या बदल्या : मुदतपूर्व बदल्यांमूळे चर्चेला उधाण; आयुक्त महिनाभर रजेवर

एक्साईजच्या दुय्यम निरीक्षक, लिपिक, कार्यालयीन अधीक्षकांच्या बदल्या : मुदतपूर्व बदल्यांमूळे चर्चेला उधाण; आयुक्त महिनाभर रजेवर



मुंबई : खरा पंचनामा

राज्यातील शासकीय विभागात बदल्यांसाठी आघाडीवर असलेल्या एक्साईज (राज्य उत्पादन शुल्क) विभागाने यावेळीही बदल्यांमध्ये आघाडी घेतली आहे. यावर्षी या विभागातील दुय्यम निरीक्षक, लिपिक तसेच कार्यालयीन अधीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. विशेष म्हणजे या बदल्यांचे आदेश प्रत्येकाला स्वतंत्रपणे पाठवण्यात आले आहेत. मात्र या बदल्या मुदतपूर्व केल्याची चर्चा आहे. शिवाय बदल्यांचे आदेश दिल्यानंतर ता विभागाचे आयुक्त दीर्घ रजेवर गेल्याने खळबळ उडाली आहे.

गेल्यावर्षी मविआ सरकार असताना मे महिन्यातच एक्साईजमधील अधीक्षक, उपअधीक्षक, निरीक्षक, दुय्यम निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. एक्साईजच्या बदल्या झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बदल्या करण्यासाठी मुदतवाढ जाहीर केली होती. मात्र नंतर ठाकरे सरकार पायउतार झाले. त्यामुळे सर्वच शासकीय विभागातील बदल्या थांबल्या होत्या. शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर अन्य शासकीय विभागाच्या बदल्या काही प्रमाणात करण्यात आल्या.

यावर्षी बदल्याच्या कालावधीत बऱ्याच अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे शिवाय बदल्याही करण्यात आल्या आहेत. मात्र यामध्ये एक्साईजच्या बदल्यांची चर्चा जोरात सुरू आहे. यावर्षी एक्साईजमधील बदल्या मुदतीपूर्वीच केल्याचे बोलले जात आहे. शिवाय बदल्यांचे आदेश वैयक्तिक पाठवण्यात आल्याने चर्चेला उत आला आहे. 

एक्साईजमधील बदल्यांचे आदेश यापूर्वी कधीही वैयक्तिक पाठवण्यात येत नव्हते. ते आदेश एकाच पत्रात नमूद होत असत. शिवाय ते शासनाच्या वेबसाईटवर तातडीने प्रसिद्ध केले जात होते. यावर्षी मात्र असा कोणताही प्रकार न झाल्याने पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यातच विरोधी पक्षनेते अजित पवारांनी बदल्यांचे रेट फिक्स असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आणखी चर्चा सुरू आहे. शिवाय एक्साईजचे आयुक्त दीर्घ रजेवर गेल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

अजितदादा, राजू शेट्टी लक्ष घालणार का?
राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी काही दिवसांपूर्वी बदल्यांचे रेट शिंदे-फडणवीस सरकारने फिक्स केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अजितदादा या प्रकरणात लक्ष घालणार का असा प्रश्न विचारला जात आहे. शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनीही बदल्यांसाठी किती रुपये घेतले जातात याची आकडेवारी मांडली होती. त्यामुळे एक्साईजच्या या बदल्यांच्या आदेशाबद्दल शेट्टी काय भूमिका घेतात याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.