Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्र एकीकरण समितीचा बंदोबस्त करू : बोम्मई

महाराष्ट्र एकीकरण समितीचा बंदोबस्त करू : बोम्मई 



हुबळी : खरा पंचनामा 

महाराष्ट्र एकीकरण समिती ही उचापती लोकांची संघटना आहे. आम्ही त्यांचा आणि त्यांच्या संघटनेचा बंदोबस्त करू. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तेथील मराठी जनतेला एक प्रकारे धमकीच दिली आहे. 

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून सर्व मराठी भाषिकांनी एकत्र येत एकच उमेदवार दिला आहे. त्यामुळे कर्नाटकात भाजप तसेच काँग्रेस उमेदवारांपुढे कडवे आव्हान आहे. याकडे हुबळी येथे भाजपच्या प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्री बोम्मई यांचे पत्रकारांनी लक्ष वेधले असता महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणजे उचापती लोकांची संघटना, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. 

महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणुकीत जनतेची माथी भडकविण्याचे काम करत आहे. बेळगावच्या जनतेला हे सर्व ठाऊक आहे. त्यामुळे बेळगावची जनता त्यांना चोख उत्तर देईल, असे बोम्मई म्हणाले. महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट यासारखे कन्नड भाषिक भाग कर्नाटकात विलीन करावेत अशी आमची मागणी असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. 

यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसला बदल आवडत नाहीत. सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले होते. त्यावेळी राहुल गांधी, खरगे कुठे होते, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.