Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्रदिनी पदक मिळालेल्या पोलिस निरीक्षकावर गुन्हा!

महाराष्ट्रदिनी पदक मिळालेल्या पोलिस निरीक्षकावर गुन्हा!



नाशिक : खरा पंचनामा

महाराष्ट्रदिनी उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष पदक मिळवलेल्या नाशिकमधील पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान त्या निरीक्षकाची बदली करण्यात आली आहे. त्याच पोलीस निरीक्षकावर फसवणुकीसंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. 

निलेश माईनकर असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एका महिला तक्रारदाराने 2016 मध्ये फसवणुकप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पुढील तपासासाठी हा गुन्हा उपनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. याच सुमारास पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांनी वेगवगेळ्या स्वरूपात पैशांची केल्याचे महिला तक्रारदाराने न्यायालयात सांगितले होते. 

त्यानुसार न्यायालयात फसवणूक तसेच अपहाराच्या जुन्या गुन्ह्यात तक्रारदाराकडून चार लाखांची खंडणी मागितल्याचे निष्पन्न झाल्याने उपनगरचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, सन 2016 मध्ये महात्मानगर येथील रहिवासी असलेल्या महिलेने फसवणुकीसंदर्भात फिर्याद दिली होती. त्यानुसार हा दाखल गुन्हा पुढील तपासासाठी गुन्हे शाखा युनिट दोनकडे वर्ग केला होता. तेव्हा गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी निरीक्षक माईनकर होते. या प्रकरणात संशयित माईनकर यांनी वेगवेगळ्या स्वरूपात पैशांची मागणी केल्याचा दावा न्यायालयात केला आहे. त्रयस्थ व्यक्तीमार्फत चार लाखांची खंडणी मागितल्याचे न्यायालयात दाखल दाव्यावर नमूद आहे. त्यामुळे खंडणीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार कांदे यांच्या वकिलांकडून करण्यात आली. त्यानुसार माईनकरांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे. गंगापूर पोलीस तपास करत आहेत.

राज्य पोलिस दलातर्फे जाहीर झालेल्या पोलिस महासंचालक पदकाच्या यादीत निरीक्षक माईनकर यांचाही समावेश होता. पालकमंत्र्यांच्याहस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. त्याच पोलीस अधिकाऱ्यावरच गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.