Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बेळंकीत एकाकडून पिस्तूल, काडतुसे जप्त : सांगली एलसीबीची कारवाई

बेळंकीत एकाकडून पिस्तूल, काडतुसे जप्त : सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

मिरज तालुक्यातील कुकटोळी-बेळंकी रस्त्यावर देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक पिस्तुल, 2 काडतुसे, दुचाकी असा 1 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.

अलपक राजकुमार कांबळे (वय 23, रा. पाण्याचे टाकीजवळ, खंडेराजुरी ता. मिरज जि. सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी अवैधरित्या शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश एलसीबीला दिले आहेत. त्यानुसार निरीक्षक सतिश शिंदे यांनी विविध पथके तयार केली होती.

एक पथक कवठेमहांकाळ पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार यांना बेळंकी ते कुकटोळी रोडवर एक जण कमरेला पिस्तुल लावून फिरत असल्याची माहिती मिळाली. पथकाने कुकटोळी ते बेळंकी रोडवर कॅनॉलजवळ, हनुमान खिंडीत सापळा रचून तरुणाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ पिस्तूल, 2 काडतुसे सापडली. त्याबाबत कसून चौकशी केल्यानंतर त्याने ते पिस्तुल त्याने  सुमित धेंडे (रा. एरंडोली) याचेकडुन आणले असल्याचे सांगीतले. त्यानंतर त्याला अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार संजय कांबळे, दिपक गायकवाड, सचिन धोत्रे, नागेश खरात, संदीप नलावडे, विनायक सुतार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.