सुरक्षित पालखी सोहळ्यासाठी पोलिस सज्ज
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचे प्रतिपादन
सासवड : खरा पंचनामा
आगामी पालखी सोहळा हा सुरक्षित पार पडणार असून यासाठी पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पोलीस प्रशासन त्यासाठी सज्ज आहे. सुरक्षित पालखी सोहळा पार पडावा यासाठी पोलीस प्रशासन सर्व बाबींवरती काटेकोरपणे लक्ष ठेवून असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यास पुढील महिन्यापासून सुरुवात होते आहे. या पालखी सोहळ्याची तयारी व पालखी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी नीरा ते सासवड असा दौरा केला. यात त्यांनी पालखी सोहळ्याचे नियोजन, पालखीचे मुक्काम तळ, पालखी विसावा व पालखी महामार्गाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
पालखी सोहळ्यासाठी आवश्यक बाबींची माहिती घेत या गोष्टींची चर्चा करत संबंधित ठिकाणच्या अधिकारी व सन्मवयक यांच्याशी चर्चा केली. पालखी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी आरोग्य विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस प्रशासन या सर्वांना सूचना दिलेल्या आहेतच. सोबत यांच्याशी समन्वय देखील साधत पोलीस प्रशासन यावर्षीचा पालखी सोहळा हा सुरक्षित पार पाडेल असे श्री. फुलारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, भोरचे उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील, सासवडचे निरीक्षक अण्णासाहेब घोलप, सहायक निरीक्षक विनोद महांगडे, सासवड नगरपालिकेचे नगरसेवक अजित जगताप, सासवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गिरमे, मोहन चव्हाण, यांसह सासवड नगरपालिकेचे कर्मचारी देखील उपस्थित होते. सासवडचे माजी उपनगराध्यक्ष अजित जगताप यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. यासोबतच सासवड नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांच्याकडून सुनील फुलारी यांनीर सर्व माहिती जाणून घेत सूचना केल्या.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.