Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पत्नीचा खून करणा-यास जन्मठेपेची शिक्षा

पत्नीचा खून करणा-यास जन्मठेपेची शिक्षा



सांगली : खरा पंचनामा

कुपवाड (ता. मिरज) येथील वाघमोडेनगर येथे पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एन. माजगावकर यांनी हा निकाल दिला. याकामी सरकापक्षातर्फे अति. जिल्हा सरकारी वकील श्रीमती. ए. व्ही. कदम यांनी काम पाहिले.

रामचंद्र विठोबा हाके (रा. वाघमोडेनगर, कुपवाड) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याला जन्मठेपेची शिक्षा व 5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 3 महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. 

मृत महिलेवर तिच्या पतीने चारित्र्याचा संशय घेऊन तिच्याशी भांडण काढून राहत्या घरामधील दरवाजा अडवण्यासाठी ठेवलेला दगड टॉवेलमध्ये बांधून पत्नीच्या डोक्यात घातला. दि. 29 जुलै 2010 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास मारुन गंभीर जखमी केले होते. त्यानंतर महिलेस उपचाराकरिता सांगली सिव्हील हॉस्पीटल येथे दाखल केले असता दुस-या दिवशी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

या गुन्ह्याचा तपास कुपवाडचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक  एन. जे. उबाळे यांनी केला. याकामी त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा फिर्यादीचा जबाब, इतर साक्षीदारांचे तपास टिपणे नोंदवून जिल्हा न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केले. याकामी एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. सदर साक्षीदारांचा पुरावा ग्राह्य मानून न्यायालयाने शिक्षा ठोठावली.

या केसमध्ये हवालदार अशोक भगवान कोळी, अशोक तुराई, वंदना मिसाळ, रेखा खोत, सुप्रिया भोसले व सांगली जिल्हा न्यायालयाचे पैरवी कक्षातील इतर पोलीसांचे सहकार्य मिळाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.