शिवसेनेचा ठाकरे गट अडचणीत येणार?
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील सत्तासंर्घषावर सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निकाल दिला. त्यामध्ये 16 आमदार अपात्रेबाबाबत तसेच शिवसेना पक्ष कोणाचा याबाबत निर्णय घेण्याचा चेंडू विधानसभा अध्यक्षांकडे टोलवला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच शिंदे गटाने नवीन पक्ष प्रतोद नेमण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरे गट अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भरत गोगावले यांची शिंदे गटाकडून प्रतोद म्हणून करण्यात आलेली निवड न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला हा दणका दिला. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्याने प्रतोदाची नियुक्ती करणार आहेत. शिवसेना आता नवा प्रतोद नेमणार आहे. गोगवालचे यांची निवड बेकायदेशीर ठरवल्याने नवा प्रतोद नेमण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रतोद नेमण्याची प्रक्रिया सुरु करणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.