Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बनावट कागदपत्राद्वारे शासनाची फसवणूक : मिरजेत गुन्हा दाखल

बनावट कागदपत्राद्वारे शासनाची फसवणूक : मिरजेत गुन्हा दाखल



मिरज : खरा पंचनामा 

शाळा सोडल्याचा बनावट दाखला दाखल करून जातीचा दाखला मिळवत शासनाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात एका मुलीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संशयित मुलगी मिरज तालुक्यातील मालगाव येथील आहे. याबाबत निवासी नायब तहसिलदार श्रीधर राजमाने यांनी फिर्याद दिली आहे. संशयित मुलीने ३० सप्टेंबर २०२१ रोजी जातीचा दाखला मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्याप्रमाणे अर्जाची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी वंशावळीप्रमाणे आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखल सादर करण्यात आला होता. 

संबंधित शाळेत त्या दाखल्याविषयी पडताळणी करण्यात आली. त्यावेळी नोंदी आढळून आल्या नाहीत असे लेखी पत्र त्या शाळेच्या मुख्याध्यापिकानी दिले. त्यानंतर तो दाखला बनावट असल्याचे निदर्शनास आले. संशयित मुलीने बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याचे समोर आल्यानंतर मिरजेच्या प्रांताधिकारी यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार तक्रार नोंद करत गुन्हा नोंद करण्यात आला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.