जीवनात कोणत्याही गोष्टीला शॉर्टकट नसतो : महानिरीक्षक फुलारी
मंगळवेढा : खरा पंचनामा
जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीला शॉर्टकट नसतो. त्यामुळे कठीण परिश्रम घ्या. मोकळ्या वातावरणात तयारी करा. विस्तृतपणे वाचन करून परीक्षेला सामोरे जा असे मार्गदर्शन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले.
मंगळवेढा येथील कै. आमदार भारत भालके अकादमीला भेट देऊन येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अकॅडमीचे संचालक श्रीकांत पवार यांनी त्यांचे स्वागत केले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री. फुलारी सीमा भागात पाहणी करत होते. त्यावेळी भारतनाना भालके करियर अकॅडमी भरतीपूर्व मार्गदर्शन केंद्राचे संचालक श्रीकांत पवार यांनी महानिरीक्षक सुनील फुलारी यांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. सीमा रेषेवरील सर्व पाहणी करून अकेडमीला भेट दिली.
यावेळी श्री. फुलारी म्हणाले, विद्यार्थ्यांनी भरतीसाठी कोणताही शॉर्टकट मार्ग धरू नये. प्रामाणिकपणे अवांतर वेगवेगळी पुस्तके वाचा. पोलीस खात्यामध्ये कायदा सुव्यवस्था दृष्टिकोनातून दिवस रात्र पोलीस असो किंवा अधिकारी यांना काम करावं लागतं. मोकळ्या वातावरणात सातत्य ठेवून प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास यश नक्की मिळते असे यावेळी फुलारी यांनी सांगितले.
यावेळी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील, मंगळवेढा पोलीस निरीक्षक रणजीत माने, पंचायत समिती माजी सभापती संभाजी गावकरी आदी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.