Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

किरन रिजिजुना हटवले : मेघवाल नवे कायदा मंत्री

किरन रिजिजुना हटवले : मेघवाल नवे कायदा मंत्री



नवी दिल्ली : खरा पंचनामा

मोदी सरकारमध्ये आज मोठा फेरबदल करण्यात आला आहे. किरन रिजिजू यांना कायदा मंत्रीपदावरुन हटविवण्यात आले आहे. अर्जुन राम मेघवाल यांची नवे कायदा मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने कायदा मंत्री किरेन रिजिजू यांचे मंत्रालय बदलले आहे. अर्जुन राम मेघवाल आता रिजिजू यांच्या जागी कायदा मंत्री असतील. तर किरेन रिजिजू यांच्याकडे पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

रिजिजू हे वर्तमान आणि निवृत्त न्यायमूर्तीबद्दलच्या टिप्पणीमुळे चर्चेत आले होते. देशात कोणीही कोणालाही इशारा देऊ शकत नाही, असेही त्यांनी कॉलेजियमबद्दल म्हटले होते. त्यांचे या विधानावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.