Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील १४३ पोलिस निरीक्षकांना उपअधीक्षकपदी पदोन्नती राजन सस्ते सांगली आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक, संजय गोर्ले कोल्हापूर सीआयडीचे अपर अधीक्षकपदी

राज्यातील १४३ पोलिस निरीक्षकांना उपअधीक्षकपदी पदोन्नती
राजन सस्ते सांगली आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक, संजय गोर्ले कोल्हापूर सीआयडीचे अपर अधीक्षकपदी



मुंबई : खरा पंचनामा

राज्यातील पोलिस निरीक्षकांची बरीच वर्षे रखडलेली पदोन्नती आता देण्यात आली आहे. तब्बल १४३ पोलिस निरीक्षकांना उपअधीक्षकपदी पदोन्नती देऊन त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शासनाचे अवर सचिव स्वप्नील बोरसे यांच्या स्वाक्षरीने बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या उपअधीक्षकपदी राजन सस्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर संजय गोर्ले यांची कोल्हापूर सीआयडीचे अपर पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.   

सांगलीतील तत्कालीन निरीक्षक अनिल चोरमले यांची अंबेजोगाईचे उपअधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. बाळासाहेब भालचिम यांची सातारा जिल्ह्यातील वाईचे उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निरीक्षक राजेंद्र शेळके यांची सातारा मुख्यालयाचे उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निरीक्षक चंद्रकांत काटकर यांची मुंबईचे सहायक पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भगवान पाटील यांची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांचे वाचक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

जयकुमार सूर्यवंशी यांची शाहुवाडीचे उपअधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. सांगलीतील तत्कालीन निरीक्षक शिवाजी आवटे यांची सीआयडी पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे. सांगलीतील तत्कालीन निरीक्षक युवराज मोहिते यांची बारामतीचे उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.