Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लोकसभेबाबत तेव्हाच अंतिम निर्णय होईल!

लोकसभेबाबत तेव्हाच अंतिम निर्णय होईल!



मुंबई : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीसाठी आढावा घेत आहे हे खर आहे. पण अंतिम निर्णय जागावाटप झाल्यानंतरच होईल. वेगवेगळ्या जिल्ह्यातील लोकांसोबत चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीचे सर्वजण एकत्र बसून ४८ जागांचा निर्णय घेतील तेव्हाच अंतिम निर्णय होईल. निवडणुकीला अजून एक वर्ष आहे. कुणाला उभं करायच असेल तर आधीच कामाला लागणं गरजेच असतं, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या 'इंडिक टेल्स' वेबसाईटवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. बुधवारी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबाबत मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली. यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी बोलत होते. 

महाराष्ट्र सदनातील पुतळे हलवण्याची गरज काय होती? भावना दुखवायच्या नव्हत्या तर पुतळा हलवला का? महापुरूषांबद्दल वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला तर जनता खपवून घेणार नाही हे प्रशासनाला माहित आहे. त्यामुळे या प्रकरणातील अधिकाऱ्यांची नावे पुढे आणा. त्यांच्यावर कारवाई करा. पण तशा प्रकारची कारवाई देखील केली जात नाही, असे पवार म्हणाले.

अगामी लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीच्या बैठकीबाबत ते म्हणाले, लोकसभेबाबत आम्ही पक्षाच्या लोकांनी काय आढावा घ्यायचा हा आमचा प्रश्न आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातील लोकांसोबत चर्चा सुरू आहे. याबाबतचा अंतिम निर्णय महाविकास आघाडीचे सर्वजण एकत्र बसून ४८ जागांचा निर्णय घेतील तेव्हाच अंतिम निर्णय होईल. कुणाला उभ करायच असेल तर आधीच कामाला लागण गरजेच असतं. निवडणुकीला अजून एक वर्ष आहे. लोकसभेसाठी आढावा घेत आहे हे खर आहे पण अंतिम निर्णय जागावाटप झाल्यानंतरच होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.