Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देऊ पण...

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देऊ पण...



कोलकाता : खरा पंचनामा

कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला पाठिंबा देण्यास सहमती दर्शवली आहे. ममता बॅनर्जी म्हणतात की, ज्या राज्यांमध्ये काँग्रेस मजबूत आहे, तिथे तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार आहे. त्याबदल्यात बंगालमध्ये काँग्रेसला तृणमूलला मदत करावी लागेल.

2024 च्या निवडणुकीचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी सर्व विरोधी पक्षांमध्ये चर्चा सुरू करू इच्छितात. राज्य सचिवालय नबन्ना येथे पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, 'मी जादूगार नाही, ज्योतिषीही नाही. भविष्यात काय होईल हे मी सांगू शकत नाही. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकते की, जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत, तिथे भाजप लढू शकत नाही. कर्नाटकात दिलेली मते ही भाजप सरकारच्या विरोधातला जनादेश आहे.

देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे, लोकशाहीचे हक्क बुलडोझरने चिरडले जात आहेत. त्यामुळे या स्थितीत परिसरात जो कोणी ताकदवान असेल त्यांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. समजा आपण बंगालमध्ये बलवान आहोत, तर बंगालमध्ये लढूया. काँग्रेसने दिल्लीत लढावे. नितीशजी आणि तेजस्वी बिहारमध्ये एकत्र आहेत. त्याचप्रमाणे इतर राज्यांमध्येही आपल्याला एकत्र काम करावे लागेल, असे त्या म्हणाल्या

ज्या जागांवर काँग्रेस पक्ष मजबूत आहे, त्या जागांवर ते भाजपशी लढू शकतात. जिथे काँग्रेस पक्ष मजबूत असेल तिथे आमचा पाठिंबा असेल. मात्र त्यासाठी काँग्रेसला इतर पक्षांनाही साथ द्यावी लागेल. आम्ही माहिती काढल्याप्रमाणे काँग्रेस 200 जागांवर मजबूत आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसला काही चांगले मिळवायचे असेल तर त्यांना काही क्षेत्रात त्याग करावा लागेल. उत्तरप्रदेशमध्ये अखिलेश यादवांना प्राधान्य द्यावे लागेल. काँग्रेसने तिथे लढू नये असे मी म्हणत नाही, पण बैठक घेऊन बोलणे आवश्यक आहे, असेही ममता म्हणाल्या.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.