Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे चेंडू जाईल : अजित पवार

विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे चेंडू जाईल : अजित पवार



मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. त्यावर अनेक कायदेतज्ज्ञ, राजकीय नेते, राजकीय विश्लेषक बरीच मते मांडत आहेत. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वेगळेच मत मांडले आहे. आमदार अपात्र बाबत न्यायालय या निर्णयाचा चेंडू विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे टोलवतील असे त्यांनी म्हटले आहे.

अजित पवार म्हणाले, "ही गोष्ट गेल्यावर्षी जून-जुलैमध्ये घडली आता जवळपास अकरा महिने झाले आहेत. आपण सर्वजण वाट पाहात होतो की कधी सुप्रीम कोर्टाचा निर्णय येतो. आता अखेर उद्या यावर निर्णय येणार आहे. निकाल काहीही लागला तरी माझं स्वतःच मत आहे की, सुप्रीम कोर्ट यासंबंधीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्याची शक्यता असेल. मी काही मोठ्या वकिलांसोबत चर्चा केली त्यांनी सांगितलं की, विधीमंडळातील ही बाब आहे त्यामुळं विधानसभेच्या अध्यक्षांकडेच हा निकाल देण्याची शक्यता नाकारता येत नाही"

आजच्या घडीला त्यांच्याकडं १४५ पेक्षा जास्त बहुमत आहे. मधल्या काळात खूप जणांनी वेगवेगळी वक्तव्ये केली की घटनाबाह्य सरकार वैगरे. पण ते सरकार चालवत आहेत, त्यांनी अर्थसंकल्प घेतला, बहुमतानं बसलेल्या सरकारच्या अधिकारांचा ते पुरेपूर वापर करत असल्याचं आपण गेल्या अकरा महिन्यांपासून पाहत आहोत. १४५ आमदारांचं पाठबळ त्यांच्याकडं जोपर्यंत आहे तोपर्यंत सरकारला धोका आहे असं म्हणण्यात अर्थ नाही, असंही यावेळी अजित पवार यांनी सांगितलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.