Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजित पवारांना चौकशीसाठी 'ईडी' का बोलवत नाही? : शालिनीताई

अजित पवारांना चौकशीसाठी 'ईडी' का बोलवत नाही? : शालिनीताई



मुंबई : खरा पंचनामा

खासरदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याचे जाहीर केले. यावर आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसच्या माजी नेत्या शालिनीताई पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

 पाटील म्हणाल्या, शरद पवारांनी आमदार, खासदारांचे म्हणणे ऐकावं, मी पवारांच्यापेक्षा १० वर्षांनी मोठी आहे, मला अजुनही लोकांनी निवृत्त होऊ दिलेलं नाही. जरंडेश्वर कारखान्यात अजित पवार यांनी १४०० कोटी रुपयांच मनी लाँडरिंग केलं आहे. दुसरीकडे हसन मुश्रीफ यांच्यावर १०० कोटींच्या गैरव्यवहारासाठी त्यांच्यावर ईडी कारवाई करते मग तुम्ही अजित पवारांना का बोलवत नाहीत, असा आरोप माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी केला.

शालिनीताई पाटील या काँग्रेसच्या माजी आमदार आहेत. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याला २०१० मध्ये लिलावाची नोटीस आली. यावेळी शिखर बँकेने महाराष्ट्रातील ४५ सहकारी साखर कारखान्यांची विक्री करण्यात आली. त्या काळात घेतलेल्या निर्णयात अजित पवार पुढ होते. त्यामुळे त्या लिलावाचे आजही अजित पवार समर्थन करत आहेत, त्यावेळी कारखान्यांच्या बाबतीत वेळच्यावेळी निर्णय घेतला नाहीत. आमच्या कारखान्याचा हप्ता फेडता आला नाही म्हणून आमचा कारखाना लिलावात काढण्यात आला, असंही पाटील म्हणाल्या.

'लिलाव झाल्यानंतर सहा महिन्यानंतर शिखर बँकेच्या अकाउंट विभागाकडून एक पत्र आले. या पत्रात आम्हाला ८ कोटी रुपयांची ठेव जमा आहे, त्याची मुदत वाढवण्यासाठी आम्हाला पत्र पाठवा, असं त्यांनी सांगितलं. पण, हे पत्र लिलाव झाल्यानंतर सहा महिन्यांनी आलं आहे. शिखर बँकेत आमच दुसर अकाउंट असल्याचे त्यांनी पाहिले नाही, त्यांना कारखाना लिलावात काढण्याची तेव्हा खूप घाई होती, असंही पाटील म्हणाल्या.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.