Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

साडेनऊ तासाच्या चौकशीत अर्धे पुस्तक वाचून झाले : जयंत पाटील

साडेनऊ तासाच्या चौकशीत अर्धे पुस्तक वाचून झाले : जयंत पाटील



मुंबई : खरा पंचनामा

तब्बल साडेनऊ तासांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीची चौकशी संपली आहे. चौकशी संपल्यानंतर जयंत पाटील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झाले. त्यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, ईडीच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली. ईडीकडे आता प्रश्न शिल्लक नसतील. चौकशीदरम्यान आपलं अर्ध पुस्तक वाचून झाले असेही त्यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, माझा या कंपनीशी कधीही संबंध आला नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांनी चांगली वागणूक दिली. तुम्हाला बराच वेळ बसावं लागलं, याबद्दल तुमचे आभार. भविष्यातही मला तुमचं असंच सहकार्य मिळेल, असं जयंत पाटील कार्यकर्त्यांना म्हणाले.

ईडीने चौकशीसाठी बोलावल्यानंतर जयंत पाटील सकाळी ईडी कार्यालयात दाखल झाले, यानंतर त्यांची तब्बल साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. जयंत पाटील यांची चौकशी सुरू होती, तेव्हा कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर आंदोलनही केलं. आयएलएफएस प्रकरणी ईडीने जयंत पाटील यांची साडेनऊ तास चौकशी केली.

ईडी कार्यालयात रवाना होण्यापूर्वी जयंत पाटील राष्ट्रवादीच्या कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना शांतता पाळण्याचं आवाहन केलं. मी ईडीच्या चौकशीला घाबरत नाही. तपास यंत्रणेला चौकशीमध्ये सहकार्य करू. मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की त्यांनी शातंता पाळावी. मी कोणतीही कागदपत्रे घेऊन जात नाहीये. कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचं पाटील यांनी म्हटले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.