Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

साई रिसॉर्ट प्रकरण : ईडीच्या आरोपपत्रात अनिल परब यांचे नावच नाही!

साई रिसॉर्ट प्रकरण : ईडीच्या आरोपपत्रात अनिल परब यांचे नावच नाही!



रायगड : खरा पंचनामा

दापोलीतील साई रिसॉट प्रकरणी ईडीने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. साई रिसॉट प्रकरणी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते, माजी मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. ईडीने या प्रकरणात चौकशीनंतर कारवाई केली होती. साई रिसॉट प्रकरणी ईडीने अनिल परब यांची चौकशी केली होती. त्याशिवाय या प्रकरणात दोघांना अटक केली आहे.

साई रिसॉर्ट प्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे व रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने अटक केली आहे. देशपांडे आणि कदम यांच्यासह चार जणांच्या नावाचा आरोपपत्रात समावेश असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणात अद्यापही तपास सुरू आहे. भविष्यात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची मुभा ईडीला आहे.

या आरोपपत्रात सध्या सहाजणांची नावे आहेत. मात्र, अनिल परब यांच्या विरोधात कोणताही आरोप केलेला नाही. परबांच्या सहभागाचा आरोपपत्रात वारंवार उल्लेख करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, थेटपणे परब यांच्यावर आरोप केलेले नाहीत. आरोपपत्रात एकूण 13 साक्षीदारांचा उल्लेख आहे. तर पंच साक्षीदारांसह 20 जणांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत. 

आरोप पत्रामध्ये मुरुड, दापोली येथे 1 एकर जमीन होती. सदानंद कदम यांनी परब यांच्या सांगण्यावरून हा सर्व व्यवहार केला. मूळ सौदा 1 कोटी 80 लाख रुपयांत झाला. त्यापैकी 80 लाख रोख स्वरूपात दिले. हा भूखंड 'सीआरझेड-3' मध्ये आहे. त्यामुळे तो नो डेव्हलपमेंट झोन आहे. अनिल परब यांनी 2 मे 2017 रोजी जमिनीचा ताबा घेतला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.