Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्या दबावामुळे माझ्यावर गुन्हा : माझा गुन्हा काय?

मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्या दबावामुळे माझ्यावर गुन्हा : माझा गुन्हा काय?





मुंबई : खरा पंचनामा

नाशिक पोलिसांनी माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. जरी गुन्हा दाखल झाला असला तरी मी कारवाईला सामोरे जाणार, मात्र माझा अपराध काय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

राऊत यांनी ट्विटरवर याबाबत भूमिका मांडली आहे. 'नाशिक पोलिसांनी माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री, गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय ? सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर सरकारचे 'गठन' बेकायदेशीर ठरले आहे. व्हिपपासून शिंदे यांना गटनेते पदी निवड करण्यापर्यंत सगळ्याच घटनाना विरोधी ठरवले आहे. सोळा आमदार कोणत्याही क्षणी अपात्र ठरविले जातील, अशी स्थिती आहे. बेकायदेशीर सरकारचे आदेश प्रशासनानं पाळू नयेत. भविष्यात खटले दाखल होतील, असे मत मी व्यक्त केले. हा अपराध आहे का? सरकारने थेट गुन्हाच दाखल केला. मी कारवाईला घाबरत नाही. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला आहे. या हुकूमशाही प्रवृत्तीशी लढावेच लागेल, असे राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.