Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

संतापजनक : वडिलांचे हात-पाय बांधून नराधम मुलाने आईवर केला अत्याचार

संतापजनक : वडिलांचे हात-पाय बांधून नराधम मुलाने आईवर केला अत्याचार 



हिंगोली : खरा पंचनामा 

एका दारुड्या मुलाने आपल्याच आईवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या नराधम मुलाने आधी वडिलांचे हातपाय बांधले आणि त्यानंतर वडिलांसमोरच आईवर अत्याचार केला. याप्रकरणी दारुड्या मुलावर हिंगोलीच्या कळमनुरी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे. 

हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील धानोरा गावात हा धक्कादायक प्रकार घडला. मुलाला दारु पिण्याची सवय होती. तर दारू पिऊन तो आपल्या आई-वडिलांना नेहमी त्रास द्यायचा. रविवारी रात्रीच्या सुमारास आरोपी नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला. यावेळी त्याचे आई-वडील झोपलेले होते. घरात आल्यावर त्याने आई-वडीलांना उठवत त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पण त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्याने भांडण सुरु केले. दारुसाठी पैसे देत नसल्याने आरोपीला खूपच राग आला. त्यामुळे त्याने आपल्या वडिलांचे हातपाय बांधले. तसेच त्यांच्यासमोरच स्वतःच्या आईवर अत्याचार केले. 

ते पाहून वडिलांनी जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. मात्र आरोपी हा वडिलांना मारहाण करत असल्याने ते देखील हतबल झाले होते. मात्र दारूच्या नशेत असलेल्या नराधमाला कसलेही भान नव्हते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.