Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोणीही मुंबईला येऊ नये : जयंत पाटील

कोणीही मुंबईला येऊ नये : जयंत पाटील



मुंबई : खरा पंचनामा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री जयंत पाटील आज 'आयएलएफएस' प्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाणार आहेत. या कारवाईविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान सांगलीतूनही प्रमुख कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत.

दरम्यान, जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ट्विट करत विनंती केली आहे की, माझी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे की कोणीही मुंबईला येऊ नये. मी या चौकशीकामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून, आपण सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे. जयंत पाटील यांना पाठींबा दर्शवण्यासाठी ठिकठिकाणी फलक लावले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 'ईडी' चौकशीविरोधात कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन सुरु आहे. राज्यभरातील कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी ट्विट करत आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

आज सकाळी ११ वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत असून, राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे. माझी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे की कोणीही मुंबईला येऊ नये. मी या चौकशीकामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून आपण सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे, असे जयंत पाटील यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.