Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जयंत पाटील उद्या ईडी कार्यालयात जाणार : कार्यकर्ते करणार आंदोलन

जयंत पाटील उद्या ईडी कार्यालयात जाणार : कार्यकर्ते करणार आंदोलन



सांगली : खरा पंचनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री जयंत पाटील सोमवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते मुंबईला आज रविवारी रवाना झाले, तर अन्य कार्यकर्ते इस्लामपूर, सांगली येथे ईडी आणि भाजपा विरोधात तीव्र आंदोलन करणार आहेत.

ईडीने पाटील यांना चौकशीसाठी बोलावले केले असून या नोटीसीनुसार पाटील हे उद्या ईडी कार्यालयात जाणार राहणार आहेत. ईडीने नोटीस देऊन पाटील यांची बदनामी चालविली असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीनेही आंदोलनाची तयारी केली आहे. सांगलीमध्ये पक्षाच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते राष्ट्रवादी कार्यालयासमोर आंदोलन करून ईडीच्या कारवाईचा आणि भाजपा सरकारचा निषेध करणार आहेत. 

यासाठी कार्यकर्त्यांनी शहर जिल्हा कार्यालयाजवळ जमावे, असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी केले आहे. दरम्यान, इस्लामपूरमध्ये ईडी कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निषेध करण्यात आला. या कारवाईच्या निषेधार्थ इस्लामपूर तहसील कचेरीसमोर ईडीचा जाहीर निषेध करून तहसीलदारांना निवेदन देण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.