Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले जगदीश शेट्टार यांचा पराभव पण भाजपसाठी ठरले जायंट किलर!

भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले जगदीश शेट्टार यांचा पराभव पण भाजपसाठी ठरले जायंट किलर!



बंगळुरू : खरा पंचनामा

कर्नाटकच्या हुबली-धारवाड मध्य मतदारसंघातून भाजपातून काँग्रेसमध्ये गेलेले जगदीश शेट्टार यांचा पराभव झाला आहे. मात्र भाजपच्या राज्यातील पराभवात ते जायंट किलर ठरल्याचे बोलले जात आहे.

तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन शेट्टार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शेट्टार यांच्या बंडखोरीमुळे भाजपाने या जागेवर महेश तेंगिनाकाई यांना मैदानात उतरवले होते. त्यानंतर सर्वांचे लक्ष हुबली धारवाड या मतदारसंघावर लागून होते.

शेट्टार हे येडियुरप्पा यांच्यानंतर दुसऱ्या नंबरचे लिंगायत समाजाचे नेते आहेत. काँग्रेसचा हात पकडल्यानंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री राहिलेले जगदीश शेट्टार यांच्या बंडखोरीमुळे त्यांनाच फटका बसल्याचे निकालातून स्पष्ट दिसून येते. परंतु शेट्टार यांचा पराभव होऊनही ते काँग्रेससाठी बाजीगर ठरलेत. तर भाजपसाठी जायंट किलर ठरले. शेट्टार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने बहुतांश विधानसभेत लिंगायत समाजाने काँग्रेसला मतदान केले.

भाजपा नेते आणि लिंगायत समाजाचा चेहरा असलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी म्हटलं होतं की, जगदीश शेट्टार यांच्यामुळे भाजपाला २०-२५ जागांचा फटका बसू शकतो. त्याचाच प्रत्यय आजच्या निकालात आला. कारण येडियुरप्पा यांच्यानंतर लिंगायत समाजाचे नेते म्हणून जगदीश शेट्टार यांच्याकडे पाहिले जाते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.