पर्स लांबवताना महिलेला फरफटत नेणाऱ्या दोघांना अटक : पोलिस कोठडी
सांगली : खरा पंचनामा
सांगली-कोल्हापूर रस्त्यावर हिसडा मारून महिलेला फरफटत नेऊन तिची पर्स लांबवणाच्या प्रयत्न करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली.
सूरज सत्ताप्पा भोसले (पिराईवाडी, कोल्हापूर), वैभव कृष्णात पाटील (केनवाडी, कोल्हापूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तसेच संजयनगर येथील एक अल्पवयीन ताब्यात घेण्यात आला आहे.
साधना सातपुते या हरिपूर रस्ता परिसरात राहतात. काल शनिवारी सायंकाळी त्या मुलीसह दुचाकीवरून निघाल्या होत्या. एसटी विभागीय कार्यालयाजवळ त्यांची दुचाकी पंक्चर झाली. त्या शास्त्री चौकाकडे निघाल्या असाताना संशयित तिघे स्टँडकडे येत होते. मायलेकींना पाहून दुचाकी थांबवली व त्यांची विचारपूस केली. त्यानंतर संशयितांपैकी एकाने पर्सला हिसडा मारला. सातपुतेंना तिघांनी दहा-पंधरा फूट फरपटत नेले.
दरम्यान, आरडाओरडा ऐकून रस्त्यावरून जाणाऱ्या चारचाकी चालकाने गाडीचा वेग कमी करत बाजूला घेतली. संशयितांची भरधाव दुचाकी चारचाकीवर आदळली. तिघेही रस्त्यावर पडले. जमाव गोळा झाला. क्षणात जमावाने तिघांना पकडले आणि बेदम चोप दिला. पोलिसांनी दोघा संशयितांसह एक अल्पवयीन ताब्यात घेतला. त्यांची दुचाकीही जप्त केली आहे. त्यातील एकजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीबाबातही विचारपुस सुरू आहे, असे निरीक्षक अभिजीत देशमुख यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.